Breaking News

 

 

गारगोटी ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांगाना अनुदान वाटप…

गारगोटी (प्रतिनिधी) :  गारगोटी ग्रामपंचायतीतर्फे १५० दिव्यांगाना जि.प. सदस्या रेश्मा देसाई  यांच्या हस्ते अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.चे माजी सदस्य राहुल देसाई, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह सावंत, सरपंच संदेश भोपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रेश्मा देसाई म्हणाल्या की, ग्रामपंचायत दरवर्षी आपल्या बजेटमधून दिव्यांगांसाठी विशेष तरतूद करते. दिव्यांग बांधवांनी ही रक्कम व्यवसायासाठी खर्च करून स्वावलंबी बनावे, असे सांगितले.

राहुल देसाई म्हणाले की, समाजातील दिव्यांग व्यक्तींना आपल्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करुन द्या. त्यांना समाजिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचे प्रतिपादन केले.

यावेळी सरपंच संदेश भोपळे उपसरपंच सचिन देसाई, सदस्य प्रकाश वास्कर, अलकेश कांदळकर, जयवंत गोरे, रुपाली कुरळे, आशाताई भाट, मेघा देसाई, सुकेशिनी सावंत, अस्मिता कांबळे, स्नेहल कोटकर आदी उपस्थित होते.

102 total views, 3 views today

One thought on “गारगोटी ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांगाना अनुदान वाटप…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा