Breaking News

 

 

मान्सूनच्या प्रवासात चक्रीवादळाचा अडथळा, पेरणीची घाई नको : हवामान खात्याचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : कडक उन्हाचे चटके सहन करणाऱ्या जनतेसह शेतकऱ्यांना आणखी काही काळ पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘वायू’ हे चक्रीवादळ पुढील २४ तासांच्या आत अरबी समुद्रात वेगाने सक्रीय होणार आहे. मुंबईला ‘वायू’ चक्रीवादळाचा धोका नसला, तरी मुंबईत आणखी पावसाची शक्यताय. मात्र चक्रीवादळ शमल्यानंतरच, मान्सून वेगाने सक्रीय होणार आहे. वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनला काहीसा उशीर होणार आहे, यामुळे पेरणी करण्याची घाई करू नये, प्रत्यक्ष मान्सून आल्यानंतर पेरणीचा विचार करावा, असं हवामान खात्यानं म्हटलंय.

या दरम्यान विदर्भ-मराठवाड्यात आणि मध्य-महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह कमजोर आहेत. चक्रीवादळ शमल्यानंतर, मान्सूनचे वेगाने प्रगती करणार आहे. यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे, वादळ गेल्यानंतर मॉन्सून वेगाने प्रगती करत १३ जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होणार आहे. मॉन्सूनच्या आगमनात राज्यात ३ ते ४ दिवसांची तफावत शक्य आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनचे आगमन लांबण्याची शक्यताय.

1,260 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे