Breaking News

 

 

धवनच्या जागी ‘या’ धडाकेबाज फलंदाजाची लागणार वर्णी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाताला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत संघाबाहेर जावे लागलेल्या शिखर धवनची जागा आता हृषभ पंत घेण्याची शक्यता आहे.  भारतीय क्रिकेट बोर्डातील सूत्रांच्या माहितीनुसार, धवन जायबंदी झाल्यानंतर पंतला संघात घेणे जवळपास ठरल्याची चर्चा आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नाथन कुल्टरचा एक उसळता चेंडू शिखर धवनच्या हातावर आदळला होता. त्यामुळं त्याच्या अंगठ्याला मार लागला. त्याची पर्वा न करता त्या सामन्यात शिखरनं धडाकेबाज शतक ठोकलं. मात्र, क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात उतरू शकला नाही. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजानं क्षेत्ररक्षण केलं. सामन्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. धवनला तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात आली आहे.

धवनच्या दुखापतीचा संपूर्ण अहवाल भारतीय संघ व्यवस्थापनाने आयसीसीला सोपवला असून धवनच्या जागी बदली खेळाडूची मागणी करण्यात आली आहे. धवन २ जुलैला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यापर्यंत उपलब्ध नसेल. शिखर धवनची जागा ऋषभ पंत घेईल, अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रीय निवडसमितीने वर्ल्डकपसाठी निवडलेल्या पहिल्या १५ जणांच्या भारतीय संघात ऋषभची निवड केली नव्हती. अनुभवाच्या बाबतीत पंत कार्तिकपेक्षा मागे पडला. पण आता आक्रमक फलंदाज धवन जायबंदी झाल्यानंतर पंत संघात यावा यासाठी व्यवस्थापन प्रयत्न करत आहे. पंत कदाचित ४८ तासांतच लंडनला रवाना होईल. 

1,257 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग