Breaking News

 

 

अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा ‘मुहूर्त’ ठरला !

मुंबई (प्रतिनिधी) : अनेक दिवस लांबणीवर पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारास अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली होती. शुक्रवार दि. १४ जून रोजी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करण्यात येणार आहे. इच्छुकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी केली असून कुणाला मंत्रिपद मिळणार याविषयी उत्सुकता वाढली आहे.

याच संदर्भात चर्चा करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सुजय विखेही होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे. विखे यांच्यासोबत काँग्रेसमधले त्यांचे काही समर्थक आमदारही भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना कसं सामवून घ्यायचं, पुढती रणनीती काय असेल अशा सगळ्या मुद्यांची या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी गिरीश महाजन हेही उपस्थित होते.

One thought on “अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा ‘मुहूर्त’ ठरला !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे