Breaking News

 

 

पद्माराजेत बहुरंगी तर सिद्धार्थ नगरमध्ये तिरंगी लढत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पद्माराजे गार्डन व सिद्धार्थनगर प्रभागासाठी होणाऱ्या पोटनिवडणूकीतील उमेदवारांना आज (मंगळवार) चिन्हांचे वाटप करण्यात आले. ताराबाई गार्डन येथील मुख्य निवडणूक कार्यालायत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली होती.

सिद्धार्थ नगर (क्र.२८) प्रभागातील उमेदवार व त्यांचे चिन्ह पुढीलप्रमाणे  १) सुशिल सुधाकर भांदिगरे (अपक्ष)-(कॅमेरा),   २) नेपोलियन अशोक सोनुले (ताराराणी आघाडी पक्ष)-(कपबशी)  ३) जय बाळासो पटकारे  (राष्ट्रीय काँग्रेस)-(हात)   

पद्माराजे गार्डन (क्र.५५) प्रभागातील उमेदवार व त्यांचे चिन्ह पुढीलप्रमाणे १) महेश शंकरराव चौगले (अपक्ष) – (नारळ),   २) शेखर महादेव पोवार  (अपक्ष) – ( दुरदर्शनसंच), ३) राजेंद्र वसंतराव चव्हाण (अपक्ष ) – (गॅस सिलेंडर),   ४) पियुष मोहन चव्हाण (शिवसेना) – (धनुष्यबाण), ५) अजित विश्वास राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस) – (घड्याळ),  ६) स्वप्निल भिमराव पाटोळे (शेतकरी कामगार पक्ष) – (कपबशी) अशी आहेत.

सिद्धार्थनगर प्रभागात तिरंगी तर पद्माराजे गार्डन प्रभागात बहुरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी  वैभव नावडकर यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचना व निर्देशानुसार चिन्हांचे वाटप केल्याचे जाहीर केले.

501 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा