Breaking News

 

 

अरुणाचल प्रदेशात सापडले वायुसेनेच्या बेपत्ता विमानाचे अवशेष

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आठवडभरापासून बेपत्ता असलेल्या एएन-३२ या भारतीय वायुसेनेच्या विमानाचे अवशेष सापडले. अरुणाचल प्रदेश सिंयांग जिल्ह्यात हे अवशेष आढळून आले. या विमानात एकूण १३ जण होते. भारतीय वायुदलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती देण्यात आली आहे.

भारतीय हवाईदलाने ट्विट केलं की ‘बेपत्ता एएन-३२ विमानाचे अवशेष लिपो येथून १६ किलोमीटर दूर दिसले आहेत. एमआय-१७ हेलिकॉप्टरला शोधमाहिमेदरम्यान सुमारे १२ हजार फूट उंचावरून टाटोच्या उत्तर-पूर्व भागात हे अवशेष दिसले.’ अवशेष मिळाल्यानंतर आता हवाईदलाची ग्राउंड टीम या विमानातील प्रवाशांच्या स्थितीबाबतची माहिती घेईल.  आता या विस्तृत भागात शोधमोहीम घेण्यात येणार आहे.  

३ जूनपासून बेपत्ता झालेल्या एएन-३२ विमान शोध घेण्यासाठी भारतीय वायुसेनेची शोध मोहीम सात दिवसांपासून ही शोध मोहीम सुरू होती. एएन-३२ विमानाने ३ जून रोजी आसामच्या जोरहट येथून चीन सीमेजवळील मेंचुकासाठी उड्डाण केले होते. पण उड्डाणानंतर विमानाचा संपर्क तुटला होता. विमानात १३ जण होते. विमानाचा संपर्क तुटल्यानंतर वायुसेनेने मेंचुका आणि त्याच्या आसपासच्या भागात शोधमोहीम सुरू केली होती.

375 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा