Breaking News

 

 

ग्रामिण रस्ते सुधारण्याला प्राधान्य : नाथाजी पाटील

गारगोटी (प्रतिनिधी) : ग्रामीण रस्ते सुधारले तर विकासाला गती येते. या जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा विचार घेऊन रस्ते विकासाला महत्व देण्यात शासनाने प्राधान्य दिले आहे. पालकमंत्र्यांच्या निधीतून विकासकामासाठी भरघोस निधी दिला जाईल, असे प्रतिपादन भाजपाचे भूदरगड तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले. ते व्हणगुती (ता.भुदरगड) येथे बोलत होते.

यावेळी नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंतर्गत रस्त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मधूरा खटांगळे या होत्या. तर अलकेश कांदळकर, प्रा. हिंदुराव पाटील हे प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

नाथाजी पाटील म्हणाले की, या गावाचे माजी सरपंच दिलीप केणे यांच्या पाठपूराव्यातून हा रस्ता  मंजूर झाला आहे. त्यांच्या प्रत्येक कामात तालुकाध्यक्ष या नात्याने मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी संतोष पाटील, विलासराव बेलेकर, नामदेव चौगले, सुनिल तेली,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रणजित आडके,संतोष पाटील-डेळकर, आनंदराव पाटील, रमेश रायजादे, सुनिल पाटील, अवधूत राणे, उपसरपंच वनिता केने, सदस्य पांडुरंग साळोखे, अनिता केणे, सुवर्णा राजिगरे, कल्पना गुरव यांच्यासहीत ग्रामसेवक, ग्रा.पं.कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

333 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा