Breaking News

 

 

गडहिंग्लज तालुक्यात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा पंचायत समितीचा निर्णय…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज तालुक्यात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय आज (मंगळवार) पंचायत समिती सभेत सर्वानुमते घेण्यात आला. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सभापती आणि इतर सदस्यांनी दिले. गेली दोन वर्षे चांगल्या पद्धतीने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविल्यानंतर त्या अधिक पारदर्शी करण्याच्या सुचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या. ही सभा सभापती विजय पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी ए.पी. गजगेश्वर यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी विट्ठल पाटील यांनी संस्था चालकांच्या दबावाला बळी न पडता केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यशस्वी राबवावी. ही प्रक्रिया राबवत असताना कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यावेळी आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले.           

जयश्री तेली म्हणाल्या की, तालुक्यात द्विशिक्षकी शाळांची संख्या वाढली आहे. ही बाब चिंताजनक असून विद्यार्थी खासगी शाळाकडे प्रवेश घेत आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विशेष करून सभापतीनी यामध्ये लक्ष्य घालून ही पदे भरुन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असल्याचे सांगितले.

प्रकाश पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीनी झाडे लावण्याकरिता टार्गेट दिले जाते. ते झाडे लावण्याकरीता नव्हे तर झाडे लावून जगविण्याचे टार्गेट दिले असावे. पन्नास टक्क्याहून अधिक झाडे जगविणाऱ्या ग्रामपंचायतीला एकवीस हजारांचे पारितोषीक स्वतःकडून देण्याचे जाहीर केले.

यावेळी बोगस बी-बियाणांची विक्री करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी. शेतकऱ्यांना चांगली बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सुचना कृषी विभागाला देण्यात आल्या. कृषी विभागाने नवीन शेती अवजारे घेण्यासाठी फॉर्म उपलब्ध आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी सपंर्क साधुन फॉर्म भरण्याचे आवाहन केले.

सभापती विजय पाटील म्हणाले, पीडब्लूडीने रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या धोकादायक वृक्ष काढून घ्यावीत. गेल्या दोन महिन्यात चंदगड मार्गावर अपघाताने प्रमाण वाढले आहे. त्यावर उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या. तसेच गडहिंग्लज तालुक्यात पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे वीज महामंडळ व पाटबंधारे विभागाने संयुक्त कारवाई करीत सर्व शेतकऱ्यांना समान न्याय देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

981 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा