Breaking News

 

 

पार्श्वनाथ ‘ट्री बँक’ उपक्रम नवी दिशा देणारा : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पार्श्वनाथ को-ऑप बँक, जैन सोशल ग्रुप आणि जितो यांच्यावतीने बी रुजवा झाडे लावा, ही संकल्पना राबऊन पार्श्वनाथ ट्री बँक सुरु केली. या उपक्रमाचे उद्घाटन पालमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पार्श्वनाथ ट्री बँक उपक्रम ग्लोबल वार्मिंगसाठी दिलासा व नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

नवीन विचार, नवी दिशा, हिरवे कोल्हापूर, आरोग्यदायी कोल्हापूर यासाठी पार्श्वनाथ ट्री बँक ही संकल्पना चांगली असून यातून ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या परिणामाला दिलासा मिळेल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

महापालिकेचे आयुक्त डॉ. एम.एस. कलशेट्टी यांनी या उपक्रमासाठी महापालिकेकडून सर्व मदत केली जाणार असल्याचे सांगितले. पार्श्वनाथ बँकेचे अध्यक्ष अभय गांधी आणि पारस ओसवाल यांनी या संकल्पनेची माहिती घेऊन यातील झाडे वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. जास्तीजास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अनिल शहा, विनोद ओसवाल, सुनीत पारीख, कुमार राठोड, तुळशीराम लटकन, जयसिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

387 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे