Breaking News

 

 

टीम इंडियाला धक्का : ‘गब्बर’ स्पर्धेबाहेर !

लंडन (वृत्त्संस्था) : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकणाऱ्या सलामीवीर शिखर धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने स्पर्धेला मुकावे लागण्याची शक्यता आहे. शिखर धवनला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नॅथन कोल्टर – नाइलचा चेंडू शिखर धवनच्या हातावर आदळला होता. यामुळे शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यामुळे धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून रविंद्र जडेजा क्षेत्ररक्षणासाठी आला होता. शिखरचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे तपासणीतून समोर आले असून त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे शिखर वर्ल्डकपला मुकण्याची चिन्हे आहेत. धवनला दुखापत झाल्याने सलामीला रोहित शर्मासोबत कोण येणार, असा प्रश्न टीम इंडियासमोर निर्माण झाला आहे. बीसीसीआयने अद्याप या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार लोकेश राहुल रोहितसोबत सलामीला येण्याची शक्यता आहे.

1,851 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे