मुंबई : भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रातील वाढीसह बंद झाला. आज धातू बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. व्यवहार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३६१ अंकांनी म्हणजेच ०.६० टक्क्यांनी वाढून ६०,९२७ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११७.७० अंकांनी म्हणजेच ०.६५ टक्क्यांनी वाढून १८,१३२ अंकांवर बंद झाला. 

भारतीय बाजारपेठेतील एफएमसीजी क्षेत्राचे शेअर्स वगळता इतर सर्व शेअर्स  मोठ्या वाढिसह बंद झाले. धातू क्षेत्रात सर्वाधिक तेजी दिसून आली. धातूंचे शेअर्स ४.३२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर निफ्टी आयटी ०.८८ टक्क्यांनी, बँक निफ्टी ०.५४ टक्क्यांनी, ऊर्जा क्षेत्र ०.९७ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. ऑटो, मीडिया आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील समभागातही तेजी दिसून आले. मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही चांगली खरेदी दिसून आली.