परिचारक गट व मनसे गटाकडून अर्ज दाखल

पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर अर्बन को-ऑप. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आज परिचारक गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये श्री प्रशांत परिचारक, रजनीश कवठेकर, हरीश ताठे, सतीश मुळे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, पांडुरंग घंटी, राजाराम परिचारक, ऋषिकेश उत्पात, गणेश शिंगण, अनंत कटप, अमित मांगले, व्यंकटेश कौलवार, मनोज सुरवसे, गजेंद्र माने, अनिल अभंगराव, माधुरी जोशी, संगीता पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

तसेच परिचारक आघाडी विरोधात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी समविचारी आघाडीतर्फे 14 जणांना संधी दिली यापूर्वीच त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित तीन जणांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले.