Breaking News

 

 

‘एमआयएम’चे नेते अकबरुद्दीन ओवेसी अत्यवस्थ : लंडनमध्ये उपचार सुरू

हैदराबाद (वृत्तसंस्था) : एमआयआमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे छोटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती गंभीर आहे. लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अजून बिघडली आहे. दरम्यान असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या समर्थकांना बंधू अकबरुद्दीन लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करा असं आवाहन केलं आहे.

अकबरुद्दीन ओवेसी हैदराबादमधील चंद्रयानगुट्टा येथील आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीपासूनच त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु आहेत. २०११ रोजी एका घटनेत त्यांना गोळी लागली होती तसंच चाकूने जखमी झाले होते. यासाठीच लंडनमध्ये ते उपचार करुन घेत आहेत. तीन दिवसांपुर्वी अकबरुद्दीन यांना पुन्हा एकदा उलट्या होण्यास सुरुवात झाली आणि पोटात दुखू लागलं. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी अकबरुद्दीन ओवेसी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

1,677 total views, 3 views today

One thought on “‘एमआयएम’चे नेते अकबरुद्दीन ओवेसी अत्यवस्थ : लंडनमध्ये उपचार सुरू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे