Breaking News

 

 

राधानगरी मतदारसंघातील ११ रस्त्यांसाठी १७.५८ कोटींचा निधी मंजूर : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राधानगरी- भुदरगड- आजरा विधानसभा मतदारसंघातील १९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी १७ कोटी ५८ लाख ५५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. प्रकाश आबिटकर यांनी दिली.

आ. आबिटकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, मागील ४ वर्षापासून मतदार संघातील रस्ते निर्मितीसाठी प्राधान्याने प्रयत्न सुरू आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी खास-बाब म्हणून राधानगरी-भुदरगड व आजरा तालुक्यातील रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे. राधानगरी तालुक्यातील इजिमा ६१ ते माजगांव रस्ता २.३२५  सुधारणा करणेसाठी १ कोटी ७६ लाख रुपये, प्रजिमा ४५ ते अडसूळवाडी (आडोली) रस्ता ०.२०० सुधारणा करणेसाठी. १५ लाख ९८ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

भुदरगड तालुक्यातील रा.मा. ५५ ते नवरसवाडी रस्ता १.४८० कि.मी. सुधारणा करणे – १ कोटी १८ लाख, रामा १८९ ते बामणे रस्ता १.३००  कि.मी. सुधारणा करणे – ८० लाख ७६ हजार, रामा १८९७ ते आंबवणे रस्ता २.०४५ कि.मी. सुधारणा करणे – १ कोटी ३२ लाख, वाघापूर ते गुरववाडी रस्ता १.२०० कि.मी. सुधारणा करणे – ८६ लाख ७६ हजार, बारवे ते इंगळेवाडी रस्ता २.१०० कि.मी. सुधारणा करणे – १ कोटी ७६ लाख, केळेवाडी ते भांडीबांबर रस्ता १.९७५ कि.मी. सुधारणा करणे, १ कोटी ४६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.  

आजरा तालुक्यातील प्रजिमा ८२ ते भादवणवाडी रस्ता १.७२५  कि.मी. सुधारणा करणेसाठी १ कोटी ९४ लाख, लाटगाव ते लाटगांववाडी रस्ता ५ कि.मी. सुधारणा करणे, ३ कोटी ९९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधील सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. या निधीसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांचे सहकार्य लाभल्याचे आ. प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.

1,869 total views, 15 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे