Breaking News

 

 

धनंजय मुंडे अडचणीत : गुन्हा दाखल करण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

औरंगाबाद (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी मुंडे यांचेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मुंडे यांनी आपल्याला राजकीय द्वेषातून या प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहेत. मुंडे यांच्या वकिलांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले.  

सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम म्हणून दिली होती. पण, हीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करत जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. नियमानुसार इनाम दिलेल्या जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. पण, दबाव आणून सदर जमिनीची खरेदी केली आहे. शिवाय, जमीन कृषक असताना ती अकृषक करून घेतल्याचं देखील याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी याचिकेमध्ये म्हटलं आहे.

फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र तपासी अंमलदारांनी यामध्ये कुठलीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे रजाभाऊ फड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. औरंगाबाद खंडपीठाने तपासी अंमलदारावर देखील यावेळी ताशेरे ओढले आहेत. तसंच धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. धनंजय मुंडेंच्या वकिलांनी सदर जमिनीच्या 7/12 वर जमीन इनाम असल्याचा कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले.

960 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा