समाज मंदिराचे काम पूर्ण , समाज्या मध्ये आनंदाचे वातावरण

पंढरपूर प्रतिनिधी /

महाराष्ट्रामध्ये सर्वत्र रस्ता रुंदीकरणाची कामे सर्वत्र सुरु आहेत. या कामांतर्गत पंढरपूर ते सोलापूर हे रस्त्याचे काम करत असताना तुंगत येथील भीमनगर मधील भीमकट्टा व झेंडा बाधित झाला होता. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आमची अशी मागणी होती की भिमकट्टा व झेंडा रूंदीकरणात जाणार आहे तर या ऐवजी आम्हाला दुसऱ्या जागेत बुद्ध विहार बांधून देण्यात यावे. या मागणीला यश येऊन दुसऱ्या जागेत बुद्धविहार बांधण्यास सुरुवात केली आहे. ते काम आज पूर्ण झाले आहे. या बांधकामाची पाहणी करताना आरपीआयचे दिसत आहेत. सुनील सर्वगोड,आप्पा जाधव, संतोष पवार, समाधान बाबर, दत्त वाघमारे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते दिसत आहेत.