Breaking News

 

 

रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी करणारा ‘पवडी’चा कामगार निलंबित…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महापालिकेच्या ताराराणी चौक विभागीय कार्यालयाकडील रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून दरमहा एक हजार रुपयांची मागणी केल्याबद्दल विजय लोखंडे यास आज (सोमवार) तडकाफडकी निलंबीत करण्यात आले. आयुक्त डॉ. एम.एस. कलशेट्टी यांनी त्याच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही दिले आहेत.

लोखंडे हा पवडी विभागाकडे कामगार असून कामावर देखरेख करणे, नियंत्रण करणे, कामांचे वाटप करणे ही जबाबदारी त्याच्यावर होती. या विभागाकडे काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून तो दरमहा एक हजार रुपये देण्याची मागणी त्याने केली होती. यासंबंधीची चित्रफित तयार करुन ती वरिष्ठांना दाखवली. त्यातील आवाज हा लोखंडे याचाच असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

निलंबनानंतर लोखंडे याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही आयुक्त कलशेट्टी यांनी दिले आहेत. याशिवाय निलंबनाच्या काळात शहर अभियंता यांच्या कार्यालयात लोखंडे याला हजेरी द्यावी लागणार आहे. याप्रकरणात सादरकर्ता अधिकारी म्हणून अधिक्षक अनिरुद्ध शेट्ये यांची तर चौकशी अधिकारी म्हणून किरण गौतम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

291 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा