Breaking News

 

 

‘पाक’कडून दहशतवादी तळ बंद केल्याचा दावा, मात्र लष्करप्रमुख म्हणाले…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवाई हल्ल्याचा जोरदार झटका बसल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादी तळ बंद केल्याचा दावा केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ आपण बंद करत असल्याचा पाकचा दावा आहे, पण भारताला अद्यापही पाकिस्तानचं हे पाऊल म्हणजे कांगावा वाटत आहे. हे दहशतवादी तळ खरंच बंद झाले वा नाहीत याची सत्यता पडताळण्यासाठी कोणतीही पद्धत नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे.

रावत म्हणाले की, पाकिस्तानशी लागून असलेल्या सीमावर्ती भागावर लष्कराची करडी नजर राहणार आहे. भारत आता पाकिस्तानच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे एक किंवा दोन तळ नाहीत. पीओकेमध्ये पाकिस्तानने दहशतवाद्यांचे अनेक तळ तयार करून ठेवले आहेत. येथून शस्त्रे आणि प्रशिक्षण देऊन त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले जाते.

258 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा