Breaking News

 

 

वानप्रस्थ वृद्धाश्रमातर्फे गरजूंना साहित्य वाटप…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एचआयव्ही बाधित कुटुंब व  दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या कुटुंबांना वर्षभर मोफत धान्य आणि दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, अंथरूण-पांघरूण, कपडे व शैक्षणिक साहित्य आज (सोमवार)  देण्यात आले. व्हाईट आर्मी आणि सावली केअर सेंटर यांनी सुरू केलेल्या वानप्रस्थ वृद्धाश्रमातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.

विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांच्या उपस्थितीत व पालकंमत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली. जाणीव संस्थेच्या सुषमा भटकली तसेच विहान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हे साहित्य स्विकारले. यवतमाळ या दुष्काळग्रस्त भागातून कामासाठी आलेल्या फोपसे कुटूंबालाही यावेळी धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गौरी देशपांडे, सुभाष साबळे, सतीश जामदार, भावेश पटेल,  प्रकाश मेहता, संदीप चव्हाण, सुलोचना श्रीधर आदी उपस्थित होते.

255 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *