Breaking News

 

 

प्रतिकूलतेवर मात करीत दक्षिणवाडीतील ऋतुजाने दहावीत मिळवले उज्ज्वल यश…

टोप (प्रतिनिधी) :  प्रतिकुल परिस्थितीवर मात करत शिक्षणासाठी रोज   तीन किलोमीटरची पायपीट करीत दहावीच्या परिक्षेत दक्षिणवाडी (ता. हातकणंगले) येथील ॠतुजा रमेश पाटील हिने ९२ % गुण प्राप्त केले.  तिच्या या जिद्दीचे परिसरातून कौतुक होत आहे. शासकीय अधिकारी बनण्याचे ऋतुजाचे स्वप्न आहे.

हातकणंगले तालुक्यातील दक्षिणवाडी हे गाव पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून तीन किलोमीटर आहे. या वाडीतमध्ये ना बस आहे ना वडाप त्यामुळे तीन किलोमीटरचा पायी प्रवास करून ती पेठवडगांव येथील होलिमदर स्कूलमध्ये शिक्षणासाठी येते. ऋतुजाची घरची परिस्थिती हालाकिची असून देखील तिने कोणताही खासगी क्लास न लावता दहावीत ९२ % गुण मिळवून यश संपादन केले.

ऋतुजाला शाळेची फी भरण्यासाठी तिच्या कुटुंबाकडे पैसेही नव्हते. अशा परिस्थितीत माझा आत्मविश्वास डगमगू नये म्हणून मला परिस्थितीची जाणीव करून देत, माझा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न माझ्या घरच्यांनी केला. पण शाळेतील शिक्षकांनाही माझ्या परिस्थितीची जाणीव होताच  शाळेनेही मला सहकार्य केले. मी शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीकांचे ऋणी असल्याचे ऋतुजा म्हणाली.

1,941 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे