Breaking News

 

 

‘कठुआ’ बलात्कारप्रकरणी तीन नराधमांंना जन्मठेप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सांझी राम याच्यासह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून इतर तिघांना ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने एकूण ७ आरोपींपैकी ६ जणांना दोषी ठरवले होते. जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी विशेष न्यायालयात पार पडली.

या प्रकरणी मुख्य आरोपी सांझी राम याच्यासह, परवेश कुमार, दीपक खजुरिया यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे, तर आनंद दत्ता, सुरेंद्र वर्मा, तिलक राज या आरोपींना ५ वर्षांची शिक्षा झाली आहे. गुन्हे शाखेने गेल्या वर्षी ९ एप्रिल रोजी आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या चार्जशीटनुसार मंदिराचा पुजारी सांझी राम या संपूर्ण घटनेचा मास्टरमाइंड होता. अपहरण केल्यानंतर मुलीला त्याच्याच मंदिरात ठेवण्यात आले होते. कोर्टाने एसपीओ दीपक खजूरिया, सुरिंदर वर्मा, प्रवेश कुमार ऊर्फ मन्नू, हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि पोलिस उपनिरीक्षक अरविंद दत्ता यांना दोषी ठरवले. तर पुजारी सांझी रामचा मुलगा विशालची निर्दोष मुक्तता केली.

सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी हा खटला जम्मू-काश्मीरच्या बाहेर पठाणकोटच्या जलद गती कोर्टाकडे सुपूर्त केला होता. १० जानेवारी २०१८ रोजी मुलगी बेपत्ता झाली होती. नंतर तिचा मृतदेह जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. मुलीला येथील एका मंदिरात कोंडून ठेवून तिच्यावर अनेक दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे.

264 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे