Breaking News

 

 

सुळे येथे घरफोडी : सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

कळे (प्रतिनिधी) :  सुळे (ता.पन्हाळा) येथील अनिल धर्माजी पाटील यांच्या  घर फोडून चोरट्यांनी सात तोळ्यांचे दागिने आणि  रोख २९,००० हजार रुपये असा २.२५ लाखांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार सकाळी अकराच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल पाटील आज सकाळी दहाच्या सुमारास आकुर्डे गावी पत्नीसह गेले होते. तसेच त्यांचे वडील शेतात गेल्याने दरवाजा बंद होता. त्याच गोष्टीचा फायदा घेऊन चोरटे भरदिवसा  सकाळी अवघ्या एक तासात चोरी करुन पसार झाले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.  चोरीनंतर घटनास्थळी पोलीसांच्या श्वान पथकाने आकुर्डे रोडवरील पाणंद रस्त्यापर्यंत माग काढला. या घटनेचा पुढील तपास कळे पोलीस ठाणे करीत आहे. 

2,784 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे