Breaking News

 

 

मुरगूड चॅम्पियन लिग फुटबॉल स्पर्धेचा ‘स्वरा स्पोर्टस्’ मानकरी…

मुरगूड (प्रतिनिधी) : प्रथमेश भाट याने सडन डेथवर नोंदवलेल्या अप्रतिम गोलच्या जोरावर स्वरा स्पोर्टने मुरगूड चॅम्पियन लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या रोमहर्षक सामन्यात जे.जे. स्पोर्ट्स संघाला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर  जनार्दन एफसीने तृतिय क्रमांक पटकावला.

स्वरा स्पोर्टच्या संतोष राजिगरे याला स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले.  बेस्ट गोलकीपर- राजेश गोधडे, बेस्ट स्ट्रायकर – अमोल चौगुले, बेस्ट मिडफिल्डर – प्रवीण मांगोरे, बेस्ट डिफेंडर – सचिन नलवडे यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेचे बक्षीस वितरण म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र मंडलिक व जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अमरीशसिंह घाडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव मेंडके, किशोरकुमार खाडे, नगरसेवक शिवाजीराव चौगुले, दीपक शिंदे, मारुती कांबळे, किरण गवाणकर, अनंत फर्नांडिस, विलास गुरव, सदासाखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सर्जेराव पाटील, राजू भाट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.309 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग