Breaking News

 

 

अन्यथा शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकू : आ.राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शालेय आणि महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे. डोनेशन, बांधकाम फी, शालेय साहित्यांच्या माध्यमातून पालक, विद्यार्थ्यांची लुट केली जात आहे. यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे कोणतेही नियंत्रण नाही. पालकांची लुट करणाऱ्या शाळा बंद करा, अशी मागणी युवासेनेने केली आहे. यावर कोणती कार्यवाही करण्यात आली नाही. याचा अहवाल येत्या दोन दिवसात द्या, अन्यथा शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा आ. राजेश क्षीरसागर यांनी आज (सोमवार) दिला.

आज शिवसेना व युवासेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, शिक्षण सम्राटांचा व शिक्षण खात्याच्या भ्रष्टाचारी कारभार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या मोर्च्यात शिक्षण सम्राटांचा राक्षस, पालक व विद्यार्थांच्या गळ्यावर सुरी ठेऊन लुट करीत असल्याचा देखावा सादर करण्यात आला.

आ. क्षीरसागर यांनी म्हणाले, शाळा, महाविद्यालयात प्रवेशासाठी लाखो रुपयांचे डोनेशन आकारले जात आहे. याकडे शिक्षण खात्याचे लक्ष नाही. शिक्षण संस्था आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची मिलीभगत असून, अधिकारी पाठीशी घालत असल्यानेच पालकांची लुट करण्याचे शिक्षण संस्थांचे धाडस वाढले आहे. काही शाळांमध्ये इमारत बांधकाम निधी नावाखाली भरमसाठ फी भरण्याची सक्ती केली जाते, हि रक्कम घेण्यासाठी शिक्षण कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली आहे काय? असा संतप्त सवाल आ. क्षीरसागर यांनी विचारला.

पालकांना ठराविक दुकानामधून शालेय साहित्य व गणवेश खरेदी करण्यासाठी सक्ती केली जाते, यामध्ये शाळेचे कमिशन असते. काही ठराविक शाळा तर उघडपणे डोनेशन घेत आहेत. यावर कोणती कारवाई कार्यालयाने केली, असा जाबही आ. क्षीरसागर यांनी विचारला. शिक्षण उपसंचालक कार्यालयाची कार्यपद्धती बदला, अन्यथा पालक आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या अधिकाऱ्यांना सळो की पळो करु, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, दीपक गौड, योगेश चौगुले, अविनाश कामते, चेतन शिंदे, विश्वजित साळोखे, शैलेश साळोखे, गुरु लाड, सौरभ कुलकर्णी, जयवंत हारुगले, किशोर घाटगे यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. 

405 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे