Breaking News

 

 

वंचित आघाडीने वंचितांना सत्तेपासून दूर ठेवले : रामदास आठवले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वंचित आघाडीला मिळालेली मते निवडून येण्यासारखी नाहीत. तसेच त्यांच्यामुळे काँग्रेस आघाडी हारली असेही नाही. वंचित आघाडी सत्तेपर्यंत कधीही पोहचणार नाही. म्हणूनच वंचित आघाडी ही वंचितांना वंचित ठेवण्यासाठी आहे. असे रिपाईचे अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

आठवले म्हणाले की, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केली असली तरी त्यामध्ये काहीही तथ्य नाही. अमेठीमध्ये काँग्रेसचा हात या चिन्हाला मते कमी पडली. तर वायनाडमध्ये जास्त पडली. यावरुन त्यांनी बोध घ्यावा. नरेंद्र मोदी समाजात फूट पाडत असल्याचे वक्तव्य राहूल गांधी करतात. त्यांनी उलटसुलट बोलण्यापेक्षा आपला पक्ष वाढवावा. राहूल गांधींना आता तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही. म्हणूनच त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्विकारले नाही.

मतपत्रिकेवर निवडणूकीची मागणी करणाऱ्या पक्षांनी त्यासाठी लागणारा वेळ, खर्च आणि अचूकता याबाबत विचार करुन सिस्टीमचा स्विकार करावा. एनडीएला प्रकाश आंबेडकर चालतील. पण ओवेसी चालणार नाहीत. राज्यात रिपाईने दहा जागा मागितल्या असून मंत्रीमंडळ विस्तारातील जागा मागितली आहे. तसेच महामंडळामध्ये ५० ते ६० जणांना संधी मिळाली आणि त्यातील काही अध्यक्षपद मिळावे, अशी मागणी केली आहे. तसेच यापूर्वी रिपाईने कधीही भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेली नाही, यापुढेही लढणार नसल्याचे आठवले म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पॉवर कमी झाली आहे का, असे विचारले असताना ते म्हणाले, काँग्रेसपेक्षा शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्षाची ताकद जास्तच आहे. पण आता शरद पवारांनी काँग्रेससोबत राहून काही उपयोग नाही. काँग्रेसला भवितव्यच राहीले नाही. म्हणून शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सोबत यावे. एनडीए देखील आता जातीवादी राहिली नाही. म्हणूनच भाजपकडे लोंढा वाढला असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

378 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे