Breaking News

 

 

क्रिकेटच्या ‘युवराजा’कडून निवृत्तीची घोषणा !

मुंबई (प्रतिनिधी) : अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग याने जगभरातील क्रिकेटचाहत्यांना धक्का दिला आहे. त्याने आज (सोमवार) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीचा निर्णय घेणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते, पण मी माझ्या कुटुंबियांशी आणि वरिष्ठ आजी-माजी क्रिकेट सहकाऱ्यांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. मात्र देशांतर्गत टी २० लीग स्पर्धांमध्ये खेळतच राहणार असल्याचे त्याने मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

भारतातील सर्वोत्कृष्ठ एकदिवसीय क्रिकेटपटूपैकी एक असलेल्या युवराज सिंग हा आजही सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. २००७ च्या टी-20 क्रिकेटमध्ये त्याने इंग्लंडविरोधात स्टुअर्ट ब्रॉड याच्या सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. त्यानंतर २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर संघाला विश्वकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. २०११ या वर्ल्ड कपचा तो मालिकावीर ठरला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २००० साली पदार्पण केले होते. मात्र, जून २०१७ नंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. युवराजकडे ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी-२०सामने खेळले आहेत.

युवराज म्हणाला की, मी माझ्या वडिलांसाठी क्रिकेटमध्ये आलो. ते स्वतः उत्तम क्रिकेटर होते. पण त्यांना क्रिकेट विश्वचषक उंचावता आला नाही. त्यामुळे त्यांनी ते स्वप्न माझ्यात पाहिले. सुदैवाने २००७ चा टी २० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक असे दोन विश्वचषक उंचावण्यात मी माझा मोलाचा वाटा उचलला असे मला वाटते.

585 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे