Breaking News

 

 

मंत्रिपदाचा वापर गरीबांना न्याय देण्यासाठी : रामदास आठवले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशात एनडीए सरकारने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी चांगल्या योजना राबवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वास मिळवून दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. या मोदी सरकारमध्ये मलाही दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळाले. याचा आनंद असून या मंत्री पदाचा गोरगरीबांची सेवा आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी करणार असल्याचे, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

आठवले म्हणाले की, राजर्षी शाहूंनी १९०२ साली आरक्षणाचा कायदा केला. स्वातंत्र्यानंतरही आरक्षण सुरु रहावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याच धर्तीवर कायदा केला. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी संसद हीच सर्वोच्च असल्याने संसदेत आरक्षणाबाबत कायद्यात बदल करुन ओबीसी, आदिवासी, मराठा यांना आरक्षण द्यावे, असे मी वारंवार केंद्रात मांडले आहे. नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण देण्यासाठी आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्नाची असलेली अट बारा लाख मर्यादेपर्यंत वाढवण्याचा विचार मोदी सरकार करीत आहे. असेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, मुद्रा योजना, स्कॉलरशिप, स्टार्टअप् आदी योजनेतून समाजातील सर्व घटकांसाठी चांगले काम केले आहे. म्हणूनच रिपाई भाजपाबरोबर आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिप वर्षातून एकदा मिळते. ती दोनवेळा मिळावी आणि त्यामध्ये वाढ करावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

अॅट्रॉसिटी कायद्य़ाचा गैरवापर होत असल्याचा समज चुकीचा असून हे पूर्वीच्या सरकारने जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्यासाठी केले आहे. यासाठी आतंरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध सवलती देत आहेत.

369 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash