Breaking News

 

 

संत गजानन शिक्षण समूहातर्फे जिल्ह्यात प्रवेश मार्गदर्शन केंद्रांना सुरुवात

महागाव (प्रतिनिधी) : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहाकडुन शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कोल्हापूरसह जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रवेश मार्गदर्शन केंद्रे सुरू झाली आहेत. यातील कॅम्पसमधील केंद्राचे उद्घाटन संस्थाध्यक्ष  अण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यामध्ये गारगोटी, आजरा, उत्तूर, बिद्री, हमीदवाडा, चंदगड, कोवाड, कुडाळ, दोडामार्ग, धारवाड येथील मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानक परिसर व महाविद्यालयातील परिसरात मार्गदर्शन केंद्राची  सुरुवात करण्यात आली आहे. यातून इंजीनिअरिंग, पॉलीटेक्निक, फार्मसीबरोबरच संस्थेतील इतर अभ्यासक्रमाच्या विद्याशाखेत प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया याबाबत समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

केंद्रावर नियुक्त केलेल्या मार्गदर्शकाकडून  विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज योजना, संस्थाअंतर्गत असणाऱ्या सुविधा, करिअरविषयक माहिती, माहिती पुस्तिकाचे वाटप केंद्रावर सुरू असून विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी आण्णासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

156 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे