Breaking News

 

 

अरबी समुद्रात होणार चक्रीवादळ ?

मुंबई (प्रतिनिधी) : हवामान तज्ज्ञांनी अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असे मतही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर सुरक्षितेसाठी मासेमारांनी ११ व १२ जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय ११ व १२ जून दरम्यान राज्याच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील, असे सांगण्यात आले आहे. तर, हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, मात्र त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या काळात चक्रीवादळाच्या टप्प्यात असलेला व किनारपट्टीजवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

387 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *