Breaking News

 

 

महावीर इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित सुर्वेनगर येथील महावीर इंग्लिश स्कूलने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून घवघवीत यश मिळविले आहे.

माध्यमिक विद्यालयातील अंतर्गत गुण देण्याची पद्धत बोर्डाने बंद करून सुरु केलेल्या नवीन परीक्षेच्या पद्धतीमध्येही महावीर स्कूलने घवघवीत यश मिळविले आहे. ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणारे २१ विद्यार्थी तर ७५ पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी यांनी संस्थेचा नावलौकिक कायम ठेवला आहे.

अभिमान गुरुबाळ माळी याने ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर आकांक्षा अर्सेकर व गौरी कळंत्रे यांनी ९७ टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक पटकावला. अशी माहिती संस्थेचे प्राचार्य धनश्री व्हनागडे यांनी दिली. तसेच काही विद्यार्थ्यांनी विविध विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.

यशस्वी विद्यार्थांना संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी व मानद सचिव महेश सामंत यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

345 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा