सांगोला/ नाना हालंगडे

सांगोला तालुक्यातील सहा ग्रामपंचायत निवडणुकीने तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व बाळासाहेबांची शिवसेना या तीन प्रमुख पक्षांना उभारी येईल अशा प्रकारचा निकाल दिसून आला शेकापने एकहाती दोन ठिकाणी झेंडा रोवला असताना आ.बापू व मा.आ.आबा गटाने दोन ग्रामपंचायतीवर तर इतर दोन ठिकाणी सर्वपक्षीय आघाडीने यश मिळवले या निकालाने सध्या राजकीय वर्तुळात काही फरक पडत नसला तरी काही अंशी आगामी निवडणुकांवर याचे परिणाम दिसून येणार आहेत

तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या निकाला नंतरचे सर्वच राजकीय पक्षाचे दावे थोडे अतिशयोक्तीचे असतात हे लक्षात घेतले तरी यातून मतदारांचा कल निश्चितपणे लक्षात येत आहे त्यामुळे हे निकाल फारसे धक्कादायक तर अजिबात नाहीत मागील निवडणुकांच्या तुलनेत यावेळी असलेला मुख्य फरक म्हणजे शेकाप विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची उघड युती यामुळे ही लढत २०१९ च्या विधानसभा निवडणुकी इतकीच लक्षणीय ठरत आहे कै.माजी आम. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या छप्पन ग्रामपंचायत निवडणुकीत ३६ ग्रामपंचायती शेकापने स्वबळावर जिंकल्या होत्या तर अनेक ठिकाणी इतर पक्षांच्या मदतीने सत्तेवर आले आहेत काल झालेल्या ६ ग्रामपंचायत निवडणूकीत ६२ ग्रामपंचायत सदस्य पैकी ३६ ग्रामपंचायत सदस्य शेकापचे निवडून आले आहेत
या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जास्त रंगतदार होतील किंवा धक्कादायक निकाल लागतील अशी काही जणांची अटकळ होती पण मतदारांनी आपापल्या परंपरागत राजकीय भूमिका कायम राखत काही अंशी शेकापला झुकते माप दिल्याचे दिसून येते गेल्या काही वर्षापासून तालुक्यात काँग्रेसची ताकद तोळा मासा असल्याचे दिसून आले शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाने तालुक्यातील असलेली वडिलोपार्जित पकड सुटू दिलेली नाही हेही यावरून सिद्ध होते ग्रामपंचायत निवडणुकी मधील आकडेवारी बद्दल नेहमीच दावे प्रति दावे होत असतात तालुका पातळीवर कोणत्याही निवडणुकीत नसणारा गाव पॅनल हा पूर्णपणे स्थानिक पर्याय समजला जातो तो ऐनवेळी सर्वच राजकीय पक्षांचे गणिते बिघडवीत असतो त्यामुळे यांचा कल कुणीकडे असणार आहे तो तपासून घ्यावा लागेल.

शेकापला शह देण्यासाठी दोन वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या पक्षाच्या नेत्यानी आता पक्षाऐवजी तालुक्यात गटाचे राजकारण सुरू केले आहे त्यांच्या या भुमिकेमुळे शेकाप अधिकच मजबूत होत आहे तर तालुक्यातील राष्ट्रवादी व मुखयमंत्री शिंदे यांची सेना गटाचे राजकारण करून दिशाहीन होत असल्याचे दिसून येत आहे तात्पुरत्या फायद्यासाठी पक्षाचे लेबल वापरायचे आणि निवडणूकीच्या वेळी आपल्या मूळ पक्षापासून अलिप्त रहायचे…. पक्ष मोठा की तालुक्यातील नेते मोठे ही दुटप्पी भूमिका याच नेत्यांना आगामी काळात गोत्यात आणल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा मात्र होताना दिसून येत आहे.

शहरी भागातील मतदानातील लक्ष्मी दर्शनाचा विषय विशेष चर्चेत असतो तुलनेने ग्रामीण भागात असा प्रकार कमी प्रमाणात घडतो असे आजवर दिसून येत होते मात्र हा तर्क या निवडणुकीने मोडून काढला मातंबरानी गावगाड्यातील सत्तेत येण्यासाठी अगदी ऑनलाईन पेमेंटचा प्रकार वापरात आणला गेल्याची चर्चा आहे.

वित्त आयोगामुळे थेट ग्रामपंचायत मध्ये निधी येत आहे तो खर्च करताना सरपंचांना महत्त्व असल्याने या पदाची खुर्ची मिळवण्यासाठी काही ग्रामपंचायतीमध्ये निर्णायक मते फिरविण्यासाठी अखेरच्या टप्प्यात मोठी रक्कम वाटण्यात आल्याचा घटना घडल्या असल्याचे बोलले जात आहे निवडणूक जितकी कमी कार्यक्षेत्राची व कमी मताची तितकी पैशाची उधळण अधिक हे सूत्र अधिक घट्ट होत चालले असल्याचे या निवडणुकीत दिसून आले.

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर काही नेत्यांनी आपल्याच पक्ष व गटाला सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा केला त्यामुळे कोणाला किती जागा मिळाल्या याचा गोंधळ निकलादिवशी सुरू होता नवनिर्वाचित सरपंच, सदस्य हे मदत केलेल्या नेत्यांची आलटून पालटून भेट घेऊ लागल्याने ते नेमके कोणत्या पक्षाचे व गटाचे हा प्रश्न ग्रामस्थांसह मतदारांनाही पडतो आहे तर यावर पक्ष, गटाने एकाच मंचावर शक्तिप्रदर्शन घडवावे असेही बोलले जात असतानाच शेकापक्षाने मंथन बैठकीत शक्तीप्रदर्शन घडवून निवडून आलेल्या ३६ ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांचा सत्कार केल्याने विरोधकांचा दावा फोल ठरला आहे येणाऱ्या सर्व निवडणुकीत सध्याचे पक्ष, गट वरिष्ठांचा पक्षादेश मानतात की गटातटाचे राजकारण रेटून नेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सांगोला येथे २१ फेब्रुवारी रोजी पक्षाच्या परिसंवाद यात्रा मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तालुक्यातील येणाऱ्या सर्व निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती, आघाडी न करता राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा कोणाच्याही कुबड्या घेऊ नका तसेच माझा बसलेल्या पैकी टोपीवाल्या पक्ष कार्यकर्त्यावर विश्वास आहे इतरावर नाही मात्र तालुक्यातील नेत्यांना याचा सोयीस्कर विसर पडल्याचे दिसून येत आहे राज्य पातळीवर पक्षाचे काम करणाऱ्या उपाध्यक्षाने तालुक्यात गटाचे राजकारण करून स्वःताच्या पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात आणले आहे.