Breaking News

 

 

‘लाईव्ह मराठी’चा उद्या दुसरा वर्धापनदिन : स्नेहमेळाव्याला यायला लागतंय..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘सर्वांत अचूक…सर्वांत जलद’ या ब्रीदवाक्यानुसार कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात डिजिटल माध्यम क्षेत्रात अमीट ठसा उमटवणाऱ्या ‘लाईव्ह मराठी’ या वेब चॅनेलचा दुसरा वर्धापनदिन रविवार दि. ९ जून रोजी साजरा होत आहे. यानिमित्त कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी, कोंडा ओळ येथील हेडा चेम्बर्समधील चौथ्या मजल्यावर असलेल्या ‘लाईव्ह मराठी’च्या मुख्य कार्यालयात सायंकाळी ५ ते ९ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महापौर सौ. सरिता मोरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर बहादूरवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील आदर्श करिअर अॅकॅडमीचे संस्थापक दिलीप देसावळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. वस्तुनिष्ठ बातम्या देऊन पश्चिम महाराष्ट्रातील वाचकांच्या मनात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘लाईव्ह मराठी’च्या स्नेहमेळाव्यास वाचक, जाहिरातदार, हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लाईव्ह मराठी परिवार आणि व्यवस्थापकीय संचालक प्रमोद मोरे यांनी केले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा