Breaking News

 

 

कोण म्हणतो प्रामाणिकपणा शिल्लक नाही ?

पेठवडगांव (प्रतिनिधी) : वडगाव नगरपरिषदेतील कंत्राटी कामगार महिलांना गटार साफ करताना सुमारे तीस हजार रुपयांचे दागिने सापडले. ते दागिने या महिलांनी मालकाकडे सुपूर्द करुन प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल वडगांव प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि नगरसेवकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पेठवडगांव येथील मशीद परिसरात वडगाव पालिकेने त्यांचेकडील महिला व पुरुष कामगारांना या भागातील गटार स्वच्छता करण्यास सांगितले. कंत्राटी कामगार महिला सुनिता जाधव व छाया जाधव या गटारीतील घाण काढत असताना त्यांना गटारात सुमारे तीस हजार किमतीची अंगठी, टॉप्स, मुगवट असे दागिने एका प्लास्टिकच्या पिशवीत सापडले. यावेळी त्यांनी हे दागिने ज्यांचे असतील त्यांना परत देण्याचा निश्चय केला.

दरम्यान आज अखिल बशीर मोमीन हे सोने दागिन्यांची रिपेअरी करणारे पालिकेचे मुकादम संदीप धनवडे यांच्याकडे आले असता दागिन्यांबाबत चौकशी केली. यावेळी तेथे काम करीत असलेल्या कामगार महिलांनी आम्हाला दागिने सापडले असल्याचे सांगितले.  मुकादम संदीप धनवडे यांनी हे दागिने ओळख पटवून नगरसेवक संतोष चव्हाण, शरद पाटील व पत्रकार संतोष सणगर यांच्या समक्ष मालकाकडे सुपूर्द केले. ज्या महिलांना हे दागिने सापडले त्यांनी दागिन्यांची हाव न धरता प्रामाणिपणे ते परत देवून आदर्शवत कार्य केले आहे.

या प्रामाणिकपणा बद्दल नगरसेवक संतोष चव्हाण, शरद पाटील, पत्रकार संतोष सणगर, मुकादम संदीप धनवडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गोरख साठे, प्रमोद साठे, सचिन माने, बजरंग सणगर, विनोद सिंहासने आदी उपस्थित होते.

798 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे