Breaking News

 

 

लँड टायटल अॅक्ट क्रांतीकारक ठरणार : शांतीलाल कटारीया

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जमिन खरेदी-विक्री व्यवहारासाठी आता देशपातळीवर नवीन लँन्ड टायटल अॅक्ट येणार असून हा नवा कायदा क्रांतीकारक ठरणार असल्याचे क्रिडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतिलाल कटारीया यांनी आज (शनिवार) सांगितले. रेरा कायद्यामुळे व्यवहारात पारदर्शकता आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

क्रिडाई महाराष्ट्राच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी क्रिडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतिलाल कटारीया कोल्हापूरात आले होते. त्यांनी देशातील बांधकाम व्यवसायातील अडचणी, कायदे याबाबत माहिती दिली. क्रिडाई नॅशनलची स्थापना १९९९ साली झाली असून देशातील २१० शहरात १२,५०० सदस्य यामध्ये कार्यरत आहेत. जमिन खरेदी-विक्री व्यवसायात देशातील ७ शहरात ७५ टक्के व्यावसायिक असून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरात त्याचे प्रमाण अधिक आहे.

महाराष्ट्रात शहरीकरण झालेली शहरे अधिक असल्याने या व्यवसायात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. आता केंद्र शासनाकडून नवा लॅन्ड टायटल अॅक्ट आला असून आगामी अधिवेशनात त्याचे बील सादर होण्याची शक्यता आहे. या कायद्यानुसार आता जमिनीचा सर्च रिपोर्टसह सर्व माहिती शासनामार्फतच मिळणार आहे. त्यामुळे त्यामध्ये परस्पर कोणताही बदल करता येणार नाही, हा नवा कायदा व्यावसायिकांसाठी क्रांतीकारक ठरणार आहे. रेरा कायद्यात नोंदणीची आवश्यकता सक्तीची असल्याने त्याचा पारदर्शी व्यवहारासाठी चांगला उपयोग झाला आहे.

ग्राहकांना विश्वास निर्माण झाला असून फसवणूकीच्या तक्रारी कमी होत आहेत. रेरा कायद्यामध्ये राज्य शासनाच्या नियमावली वेगवेगळ्या असतात. त्या देशपातळीवर समान असाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

1,203 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा