Breaking News

 

 

क्रिडाईच्यातीने बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्यात यश : राजीव परीख

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  बांधकाम क्षेत्रात जीएसटीबाबत सुसूत्रता आणली असून मंत्रालय पातळीवर क्रिडाई महाराष्ट्रतर्फे येवू घातलेले नवीन कायदे, नगररचना संचालक, प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करुन मुंबई वगळता महाराष्ट्रातील सर्व शहरांना लागू होतील, यासाठी प्रयत्न केले आहेत. असे प्रतिपादन क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परीख यांनी आज (शनिवार) सांगितले.

क्रिडाई महाराष्ट्र या राज्य संघटनेची पहिली वार्षिक सर्वसाधरण सभा कोल्हापूरात पार पडली. सभेसाठी क्रिडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतिलाल कटारीया, उद्योगपती संजय घोडावत यांच्यासह राज्यातील चाळीस शहारातील ३५० बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. सभेची सुरुवात झाडांच्या रोपांना पाणी घालून करण्यात आले. क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात संस्थेच्या कामकाजाचा आढावा आणि पुढील नियोजन याबाबत माहिती दिली.

यावेळी क्रिडाई कोल्हापूर वुमेन्स विंगची स्थापना करुन समन्वयक म्हणून सपना मिरजकर आणि अर्चना रॉय यांची निवड करण्यात आली. यासाठी क्रिडाई महाराष्ट्र महिला विंगच्या अर्चना बडेरा उपस्थित होत्या. क्रिडाई नॅशनलचे शांतिलाल कटारीया यांनी राष्ट्रीय पातळीवर संस्थेच्या सुरु असलेल्या कामाची माहिती दिली.  

यावेळी क्रिडाई महाराष्ट्रचे पदाधिकारी, क्रिडाई कोल्हापूरचे सर्व संचालक उपस्थित होते.

357 total views, 18 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा