Breaking News

 

 

बीजेपी किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाजीराव देसाई…

गारगोटी (प्रतिनिधी) :   बाजीराव देसाई यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष योगेश परुळेकर आणि भुदरगड तालुकाध्यक्ष नाथजी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी जिल्हा दूध संघाचे संचालक बाबा देसाई  व  मौनी विद्यापीठ संचालक अलकेश कांदळकर उपास्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नविषयी बाजीराव देसाई यांना पूर्ण जाण असल्याने त्यांची किसान मोर्चाच्या उपजिल्हाध्यक्ष पदी निवड केली असून पश्चिम भुदरगड मध्ये भाजप पक्षला बाजीराव देसाई यांच्या रूपाने संघटन कौशल्य असलेला लढाऊ कार्यकर्ता मिळाला असल्याचे नाथाजी पाटील यांनी सांगितले.

बाजीराव देसाई यांनी आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका लढवल्या असून तरुणांना सोबत घेऊन भुदरगड तालुक्यातील प्रत्येक गावात भाजपचे मजबूत संघटन उभे करणार असल्याचे सांगितले.

यावेळी विलास बेलेकर, प्रा. हिंदूराव पाटील, संतोष पाटील, नामदेव चौगले, रणजित आडके, सुनिल तेली,जयराम कांबळे,संदीप भुतूरने,विनायक देसाई, संतोष पाटील (डेळेकर) आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

75 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा