Breaking News

 

 

दहावीच्या परिक्षेत उषाराजे हायस्कूलचे घवघवीत यश…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलने मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचा ९५.५९ टक्के इतका एकुण निकाल लागला आहे.

परीक्षेला बसलेल्या ३८६ विद्यार्थींनींपैकी १५६ विद्यार्थ्यींनींनी विषेश प्राविण्य, ११४ प्रथम श्रेणीत, ८५ द्वितीय श्रेणीत तर १४ विद्यार्थींनी पास श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळेत गुणानुक्रमे – राजनंदिनी सरदेसाई ९७.८० टक्के (प्रथम क्रमांक), पल्लवी साळोखे ९५.८० (द्वितीय क्रमांक), धनश्री पटेद – ९४.२० टक्के (तृतिय क्रमांक) यश संपादन केले आहे.

मागासवर्गींयामध्ये – कार्तिकी गावडे- ९०.४० टक्के, सिद्धी हुंबे – ९०.४० यांनी प्रथम क्रमांक मिळवला. दिव्यांगमध्ये – दिप्ती कवळेकर ८२ टक्के गुणांनी यश मिळवले. य़शवंत विद्यार्थींनीना संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष क्रांतीकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, मुख्याध्यापिका सौ. एस.व्ही. जाधव, उपमुख्याध्यापिका सौ. ए.यु. साठे, पर्यवेक्षिका सौ. एस.डी.चौधरी आणि सौ. व्हि.डी. जमेनीस यांचे मार्गदर्शन मिळाले.

2,514 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे