मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा वाईट ठरला आहे. आठवड्याचा व्यवहाराचा शेवटचा दिवस तर ब्लॅक फ्रायडे ठरला. शुक्रवारी सेन्सेक्स ९८०.९३ अंकांनी कोसळून ५९,८४५.२९ अंकांवर आला, तर निफ्टी ही ३२०.५५ अंकांनी घसरून १७,८०६.८० अंकांवर घसरला.

मागील सात व्यवहारांच्या दिवसांत ६ वेळा शेअर बाजार कोसळला. या घसरणीमुळे गेल्या ७ दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १९ लाख कोटी रुपयांची मोठी घट झाली आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात सातत्याने वाढ, जागतिक स्तरावर मंदीची भीती आणि आता चीन-जपानसह जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ यासह अनेक कारणांचा परिणाम शेअर बाजारावर झाला.