Breaking News

 

 

कवठेमहांकाळ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडका ; गारपीटीमुळे द्राक्षांचे नुकसान

सांगली (प्रतिनिधी) : कवठेमहांकाळ तालुक्यातील  आगळगाव, शेळकेवाडी या गावांसह अनेक गावांमध्ये रात्रीच्या सुमारास विजेच्या गडगडाटात पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे द्राक्ष पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. तर अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे.

एकीकडे बळीराजा पावसाची वाट बघतो आहे. तर दुसरीकडे गारपीट आणि पाऊस झाल्याने द्राक्षबागांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एवढंच नाही तर अनेकांचे संसारही रस्त्यावर आले आहेत. अनेक घरे उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. यात द्राक्ष पिकांचे नुकसान झाल्याने द्राक्षे उत्पादक हवालदिल झाले आहेत.

417 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *