Breaking News

 

 

काश्मीरसह अन्य मुद्द्यावर चर्चा करू ; इम्रान खानचे मोदींना पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. काश्मीरसह दोन्ही देशांसाठी अनुकूल असलेल्या अन्य मुद्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

किरगिझस्तानात ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोदी-इम्रान खान यांची भेट होणार अशी चर्चा होती. पण अशी कुठलीही भेट होणार नाही हे भारताने स्पष्ट केल्यानंतर इम्रान खान यांनी हे पत्र लिहिले आहे. दोन्ही देशातील जनतेला गरीबीतून बाहेर काढण्यासाठी चर्चा हा एकमेव मार्ग आहे. प्रादेशिक विकासासाठी दोघांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. पाकिस्तानची काश्मीरसह सर्व समस्यांवर समाधान शोधण्याची इच्छा आहे असे या पत्रात म्हटले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये कमालाची तणाव निर्माण झाला होता. युद्धापर्यंत परिस्थिती पोहोचली होती. अजूनही हा तणाव निवळलेला नाही. भारताने पाकिस्तानच्या बालकोटमधील जैशच्या तळावर एअर स्ट्राइककरुन या हल्ल्याला उत्तर दिले होते.

255 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे