Breaking News

 

 

मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालदीव सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘निशान इजुद्दीन’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रसारभारतीने ट्विटरवरून दिली आहे. मोदी सध्या दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  

दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. आज (शनिवार) ते मालदीवला जातील. त्यानंतर रविवारी ते श्रीलंकेच्या दौऱ्यावर असतील. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी मागील आठवड्यात मोदींच्या शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मालदीव भारताचा एक चांगला मित्र असून या दोशासोबत आपली संस्कृती आणि इतिहास खोलवर जोडला गेला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात मालदीवसोबत भारताचे द्विपक्षीय संबंध खूपच मजबूत झाले आहेत. या भेटीमुळे हे नाते अधिकच घट्ट होईल असे मोदींनी या दौऱ्यावर भाष्य करताना म्हटले आहे.

मोदी मालदीवचे राष्ट्रपती सोलेह यांच्यासोबत मिळून कोस्टल सर्विलन्स रडार सिस्टिमला लॉन्च करतील. या रडार्समुळे हिंदी महासागरात भारतीय नौद निरीक्षणासाठी मदत मिळेल.

90 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा