Breaking News

 

 

डिजिटल माध्यमातून शरद पवार साधणार तरुणांशी संवाद…

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रातही सोशल मिडीयाचे महत्त्व वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या फेसबुक पेजवरून तरुणांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार ९ जून रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या शरद पवार या फेसबुक पेजवर लाईव्ह असणार आहेत.

सोशल मिडीयाचा वापर करून भाजपने आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्या तुलनेत या तंत्राचा प्रभावी वापर करणं विरोधकांना जमलं नाही. याचा त्यांना निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी काळात असा फटका बसू नये म्हणून शरद पवार यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून रोजी वर्धापन दिन आहे. त्याआधी होणाऱ्या या संवादात शरद पवार पक्षाच्या ध्येय-धोरणाविषयी बोलण्याची शक्यता आहे. तसेच ते फेसबुकवरून राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावनाही जाणून घेणार आहेत.

दरम्यान, फेसबुक पेजवरून शरद पवार हे सर्वसामान्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर देणार आहेत. लोकांनी आपल्या नाव-गावासह प्रश्न विचारावेत. त्यातील निवडक प्रश्नांना शरद पवार उत्तर देतील, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.

198 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे