Breaking News

 

 

सात वर्षांच्या अंध ‘श्रावणी’ला सेवा ट्रस्टची मदत…

टोप (प्रतिनिधी) : खेळण्या बागडण्याच्या दिवसात एक डोळ्याने अंधंत्वाला सामोरे जाणाऱ्या सात वर्षाच्या श्रावणी सचिन भोसले या बालिकेला डोळ्याच्या उपचारांसाठी पाच हजाराची आर्थिक मदतीचा धनादेश चांगभलं सेवा ट्रस्टच्या वतीने देण्यात आला.

श्रावणीच्या घरात दिवसभर काबाडकष्ट केल्याने रात्रीच्या भाकरीची सोय होते. अशा कुटुंबातील या मुलीला लहान वयातच एका डोळ्याने अंधंत्व आल्याने कुंटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्यावर उपचार करण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च अनपेक्षित असल्याने तिच्यावर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. श्रावणीच्या वडीलांनी आपली दहा गुंठे जमीन विकून उपचारासाठी मुंबई येथील जेजे हॉस्पिटलमध्ये दिड वर्षे उपचार केले. पण पैश्याअभावी वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. तिच्या वडीलांनी उसनवार करत, मदत मागून तिच्यावर उपचार व्हावेत यासाठी धडपड सुरू आहे. 

श्रावणीने चांगले शिक्षण घेवून स्वःताच्या पायावर उभे रहावे, अशी तिच्या कुंटुंबाची इच्छा आहे. पण औषधोपचारासाठी खर्च खूप असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी चांगभलं सेवा ट्रस्टच्या वतीने श्रावणीच्या कुटुंबाला पाच हजारांची मदत करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष केरबा पाटील, उपाध्यक्ष सूर्यकांत वायदंडे, सचिव पांडूरंग करंडे, सदस्य निलेश कदम, स्वराज करंडे आदी उपस्थित होते.

1,029 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा