पंढरपूर प्रतिनिधी 

बुधवारी सायंकाळच्या दरम्यान पंढरपूर कोर्टी या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात एक ठार तर दोघे जखमी झाले आहेत.

याबाबत पॉलिकेसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आलेल्या मोटारसायकल वरील तरुणाला क्रुझर जीपची समोरासमोर जोराची धडक बसल्याने मुंबई येथील परशुराम मोहन येवलेकर वय २८ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर माळशिरस तालुक्यातील खंडाली येथील उमाकांत खटके व स्वप्नील साळवे हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.पंढरपूर ग्रामीण पोलिसाकडून जीप चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहते.