मुंबई : भारतीय शेअर बाजारातील व्यवहारात आजही अस्थिरता दिसण्याची शक्यता आहे. प्री-ओपनिंग सत्रात शेअर बाजारात तेजी दिसून आली. व्यवहार सुरू झाल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. त्यानंतर पुन्हा एकदा विक्रीचा जोर वाढल्याने सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. आशियाई शेअर बाजार आणि एसजीक्स निफ्टीत तेजी दिसून आल्याने भारतीय शेअर बाजारातही तेजी दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 

आज सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८९.९३ अंकांच्या तेजीसह ६१,२५७ अंकांवर खुला झाला; तर एनएसई निफ्टीचा निर्देशांक ८९.७० अंकांच्या तेजीसह १८,२८८.८० खुला झाला. त्यानंतर विक्रीचा दबाव वाढू लागल्याने निर्देशांकात घसरण दिसून आली. सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स १०९ अंकांच्या घसरणीसह ६०,९५८.१२ अंकावर व्यवहार होता, तर निफ्टी निर्देशांक ३५ अंकांच्या घसरणीसह १८,१६३.८० अंकांवर व्यवहार करत होता.