Breaking News

 

 

‘टोयोटा ग्लान्झा’ कारचे सोनक टोयाटोमध्ये अनावरण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रिमियम हॅचबॅक श्रेणीतील पहिल्या टोयोटा ग्लान्झा कारचे अनावरण संभापूर (ता. हातकणंगले) येथील सोनक टोयोटामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी उल्हास नरगुंद, उद्योजक चंद्रशेखर डोली आणि दिपक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

टोयोटा व सुझुकी या दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने टोयोटाने प्रिमियम हॅचबॅक श्रेणीतील ही कार विकसित केली आहे. टोयोटा ग्लान्झा असे या कारचे नाव असून याचे इंजीन १२०० सीसी पेट्रोल आहे. या कारमध्ये मॅन्युअल व ऑटो ट्रान्समिशन असून ग्राऊंड क्लिअरन्स १७० मिमी आहे. याचे मायलेज प्रतिलिटर २४ किमी इतके आहे. तसेच कारमध्ये १६ इंच डायमंड कट व्हिल असून  क्लायमेंट कंट्रोल एसी, स्मार्ट इन्फोटेमेंट सिस्टिम, की लेसची सुविधा देण्यात आल्या आहेत. या कार पाच आकर्षक रंगात उपलब्ध आहेत. तर या कारची किंमत ७.२८ लाखांपासून सुरू होते.

यावेळी मारुतीराव जाधव, निवृत्त पोलीस उपअधिक्षक सतीश माने, शिरीष सप्रे, विक्री व्यवस्थापक विनायक धाबाडे, नितीन वसगडेकर, सुशांत देसाई, रवीकुमार जाधव, प्रदिप कांबळे, हृषिकेश सबनीस, सोनक टोयोटा कोल्हापूरचे मुख्य व्यवस्थापक राजेश माळी उपस्थित होते.

570 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग