Breaking News

 

 

पोर्ले येथे नदीत आढळला तरुणाचा मृतदेह : मृत्यूबाबत संदिग्धता

बाजारभोगाव  (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथील कासारी नदीच्या पात्रात दुचाकीसह पडलेल्या तरुणाचा मृतदेह आज (शुक्रवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. युवराज नारायण राणे  (वय २६, रा. पोहाळे  तर्फ बोरगाव) असे  त्याचे नाव आहे. त्याचा मृत्यू अपघाती की घातपात झालाय, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, युवराज राणे  सेंट्रींगचे काम करत होता. मांजरे ता. (शाहुवाडी) येथे काम सुरू असल्याने  तो गुरुवारी रात्री कामावर जातो असे घरी सांगून मित्राची दुचाकी घेऊन गेला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास पोर्ले तर्फ बोरगाव येथील कासारी नदी वऱील नवीन पुलाजवळ त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो पुलाच्या कठड्यावरून गाडीसह नदीच्या पात्रात पडला. डोक्याला जोराचा मार लागून नदीत पडल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला . मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे . 

आज  सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना नदीच्या पात्रात मोटरसायकल पडलेली दिसली. अधिक चौकशी केली असता पाण्यामध्ये मृतदेह असल्याचे आढळले.  ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी  रस्त्यावरील पुलाच्या कठड्यापासून नदीचे पात्र  जवळ-जवळ पन्नास ते साठ फूट अंतर असून झाडे-झुडपे व दगडी पिचिंग  आहे. असे अडथळे असताना  तो दुचाकीसह थेट नदीपात्रात कसा काय गेला? झाडेझुडपे तसेच दगडांना आदळून गाडीवरून बाजूला कसा पडला नाही. त्यामूळे अपघात की घातपात आहे, अशी घटनास्थळी सुरु होती .

बाजारभोगावचे सरपंच नितीन पाटील यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. कळे ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई , सहाय्यक  फौजदार सर्जेराव पाटील पथकासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आला.  राणे  याच्या पश्चात आई, लहान भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे