Breaking News

 

 

महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत संघटना समाधानी : विलास कुरणे

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या सोयीनुसार व पारदर्शक झाल्याचे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आज (शुक्रवार) सांगितले.

याबाबत संघटनेचे कार्याध्यक्ष विलासराव कुरणे म्हणाले, जिल्ह्यात १३८  बदलीपात्र कर्मचारी होते. यामध्ये लिपीक ६६,  अव्वल कारकून ५०, मंडल अधिकारी २२ या सर्वांच्याकडून बदलीच्या ठिकाणी इच्छेप्रमाणे मागून घेण्यात आली होती. यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आपल्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली अप्पर जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी आणि सहाय्यक चिटणीस यांची समिती नेमूण बदलीपात्र कर्माचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. या सर्व कर्मचाऱ्यांना सोयीच्या गावात किंवा महसूल खात्यात्या कार्यालयात कमीतकमी अंतरावर बदल्या केल्या.

यामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना हव्या त्या ठिकाणी, महिलांना प्राधान्य देऊन बदल्या केल्या. यामुळे बदलीबाबत कोणाच्याही तक्रारी राहिल्या नाहीत. तसेच राज्य महसूल कर्मचारी संघटना आणि तलाठी व मंडल अधिकारी संघटना समाधानी आहेत. यापूर्वी अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन बदली प्रक्रिया झाल्या नव्हत्या. पण यावेळी त्या झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवकुमार वाली, धनाजी कलिकते, अजित काटकर, अनंत दांडेकर, सुनिल देसाई, विनायक लुगडे उपस्थित होते.

225 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग