Breaking News

 

 

चंद्रकांतदादांचा वाढदिन यंदाही साध्या पद्धतीने : दुष्काळी भागातील मुलींच्या शिक्षणासाठी निधी देण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदाही त्यांना कोणतीही भेटवस्तू, हारतुरे न देता राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळी तालुक्यातील मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी निधी द्यावा, असे आवाहन सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत केले.

चिकोडे म्हणाले की, मागील सहा वर्षांपासून चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस संवेदना सोशल फौंडेशनतर्फे साजरा करण्यात येतो. समाजातील गरजू लोकांना लाभ व्हावा, याची दक्षता घेतली जाते. यावर्षी चंद्रकांतदादा ९ जून रोजी दिल्ली येथे असून ते १० जून रोजी दुपारी कोल्हापूरात येणार आहेत. त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारणार आहेत. सायंकाळी सहा वाजता पोलीस ग्राऊंड जवळील नव्याने साकारण्यात येणाऱ्या ट्रॅफिक पोलीस ग्राऊंडचे उद्घाटन करुन रात्री नऊ वाजेपर्यंत वाढदिवसांच्या शुभेच्छा स्विकारणार आहेत.

शुभेच्छा देताना कुणीही हार, पुष्पगुच्छ, मिठाई आणू नये त्याऐवजी दुष्काळी तालुक्यातील मुलींच्या शिक्षणासाठी मदत म्हणून संवेदना सोशल फौंडेशन या नावाने धनादेश किंवा रोख स्वरुपात मदत करावी, असे आवाहन चिकोडे यांनी केले. पोलीस ग्राऊंड जवळील ट्रॅफिक पोलीस ग्राऊंड हा प्रकल्प साकारण्यात येत असून तीन एकर जागेत वाहतुकीचे नियम, रस्ते, रस्त्यावरील वाहतुकीची चिन्हे याची सखोल माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. याबरोबरच याठिकाणी सभागृह बांधण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय काळातच वाहतुकींच्या नियमांची माहिती व्हावी, यासाठी प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे केएसबीपीचे सुजय पित्रे यांनी सांगितले.

219 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash