कळे (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय रग्बी (पुरुष) चॅम्पियन्स स्पर्धेत अत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात पन्हाळा तालुक्यातील श्री लहू बाळा परितकर महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. प्रतिस्पर्धी सातारा येथील लाल बहाददूर शास्त्री कॉलेजच्या संघास ३-२ अशा फरकाने हरवून परितकर महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.

विजेत्या संघामधील यश अनिल लंबे, कार्तिक सर्जेराव पाटील, सुहास संभाजी पाटील, सौरभ अनिल पाटील, गणेश रंगराव कौलवे या ५ खेळाडूंची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ओडिसा येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली.

तसेच उत्तम सदाशिव पाटील, समर्थ राजाराम पाटील, अनिरुद्ध बलवंत सोलापुरे, अमन नितीन पाटील, सुशांत संजय चौगुले (राखीव), ओंकार एकनाथ माळी (राखीव). ऋतुराज बाजीराव पाटील (राखीव) या खेळाडूंचा संघामध्ये सहभाग होता. खेळाडूंना प्रशिक्षक दीपक पाटील (सचिव, कोल्हापूर जिल्हा रग्बी असोसिएशन) यांचे प्रशिक्षण लाभले. संस्थेचे संस्थापक मारुती परितकर, कार्याध्यक्ष मंदार परितकर, प्राचार्या बी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन व प्राध्यापक, कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.